- मुंबई - लॉकडाऊन दरम्यान पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास मरीन ड्राइव्ह परिसरात नाकाबंदी दरम्यान 2 पोलीस अधिकारी आणि 1 पोलीस कॉन्स्टेबलवर एका माथेफिरुने चॉपरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील ब्रीच कॅण्डी परिसरात सिल्व्हर ओक इस्टेट येथे राहणाऱ्या करण प्रदीप नायर (27) या युवकाने पोलिसांवर हल्ला केला आहे.
सविस्तर वाचा -धक्कादायक : माथेफिरुचा 3 पोलिसांवर चॉपरने हल्ला
- सातारा- कोल्हापुरात असलेल्या मुलांना आणण्यासाठी पुण्याहून कोल्हापूरकडे जात असलेल्या दाम्पत्याच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना कराड तालुक्यातील उब्रंज हद्दीत आज पहाटे चारच्या सुमारास घडली. अमित आप्पाजी गावडे (वय.३८) आणि डॉ. अनुजा अमित गावडे (वय.३५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
सविस्तर वाचा - उंब्रज जवळ कार अपघातात पुण्याचे दाम्पत्य जागीच ठार
- मुंबई - महापालिकेच्या सायन रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहाशेजारी इतर रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांच्याकडील चार्ज काढून नायर रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांच्याकडे देण्यात आला आहे.
सविस्तर वाचा -मृतदेहा शेजारी उपचार: सायन रुग्णालयाच्या अधिष्ठात्याला भोवले, तातडीने केली बदली
- दौंड (पुणे) - राज्य राखीव दलातील आणखी 15 जवानांचा कोरोना विषाणूचा वैद्यकीय तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आली आहे. ही माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी संग्राम डांगे यांनी दिली. आता दौंड तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 25 झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वाचा -दौंड एसआरपी'त आणखी 15 जवान कोरोना पॉझिटिव्ह
- ठाणे - एका कोरोनाबाधित रुग्णाला उल्हासनगरातील शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाकडून झालेली चूक लक्षात येताच, त्या रुग्णाच्या घरी जाऊन त्याला ५ तासानंतर पुन्हा रुग्णालयात आणून त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत.
सविस्तर वाचा -धक्कादायक..! उल्हासनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्णालाच शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज
- हिंगोली -शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेले जवान रुग्णालयाच्या गच्चीवर फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. तसेच ते परिचारीकांना उद्धटपणे बोलले असल्याचा प्रकारही समोर आला होता. त्यावरून शल्यचिकित्सक किशोर श्रीवास यांनी तातडीने राज्य राखीव पोलीस बलाच्या समादेशकांना पत्र लिहून जवानांची स्थिती सांगितली. त्यानंतर जवानांनी त्यांच्यावर लावलेल्या आरोपाचे खंडन केले आहे. रुग्णालयात स्वच्छता नाही, तसेच कुठल्याही सोयी-सुविधा नसल्याचे त्यांनी सांगितले.