- औरंगाबाद- कोरोनाचा संसर्ग आता वेगाने वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे, यात पोलीस विभाग देखील मागे नाही. मालेगाव येथील बंदोबस्तासाठी औरंगाबादमधून गेलेले 'भारत बटालियन'चे जवान शहरात परतले आहेत. यामधील तब्बल 72 जवान कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.
सविस्तर वाचा :Coronavirus : औरंगाबाद एसआरपीएफ कॅम्पवर 'कोरोना' बॉम्ब, 72 जवान पॉझिटिव्ह
- मुंबई - औरंगाबादजवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. सोबतच मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
सविस्तर वाचा :करमाड रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- मुंबई -औरंगाबादजवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले असून यात त्यांनी सरकारला काही सुचना देखील केल्या आहेत. 'करमाड येथील रेल्वे अपघातानंतर स्थलांतरित मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आला असून याबाबत सरकारने गांभीर्याने भूमिका घ्यावी आणि भरारी पथकाची नेमणूक करावी' अशा सुचना शरद पवारांनी केली आहे.
सविस्तर वाचा :'करमाड रेल्वे अपघाताने मनाला यातना; स्थलांतरीत मजुरांसाठी तातडीने भरारी पथकांची नेमणूक करा'
- मुंबई - आर्थर रोड कारागृहातील तब्बल 103 जण कोरोना संक्रमित झाल्याची बाब समोर आली आहे. यात 77 कैदी आणि 26 कारागृह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे कारागृहात खळबळ माजली आहे. सध्या येथे 2 हजार 800 कैदी आहेत. कोरोनाबाधित कैद्यांना आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील सेंट जॉर्ज जी. टी. रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याविषयी माहिती दिली आहे.
सविस्तर वाचा :बापरे! आर्थर रोड कारागृहात 77 कैदी, 26 कर्मचाऱ्यांसह तब्बल 103 जणांना कोरोनाचा संसर्ग
- अमरावती -देशात लॉकडाऊन सुरू असल्याने लाखो मजूर हजारो किलोमीटर पायपीट करून गाव गाठतानाचे चित्र दरोरोज पाहायला मिळत आहे. मात्र, अमरावतीमध्ये चक्क एका तळीरामाने फक्त दोन बाटल्या देशी दारूसाठी तब्बल १४ किलोमीटरचे अंतर पायी चालण्याचा पराक्रम केला आहे.
सविस्तर वाचा :दारू दुकानदाराकडून 'दर्दी ग्राहका'चे हार घालून जंगी स्वागत, तळीरामांकडूनही हार घालत आभार
- वॉशिंग्टन डी. सी -विशाखापट्टनम वायूगळती प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, असे संयुक्त राष्ट्राचे सरचिटनीस अँटोनियो गुटेरस यांनी म्हटले आहे. वायूगळतीमुळे ११ जणांचा मृत्यू झाला असून परिसरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कारखान्याच्या परिसरात राहणाऱ्या गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. वायूचा प्रभाव कमी करण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.