- मुंबई :मुंबईत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी 10 अधिकाऱ्यांच्या बदल्या करुन, अचानक मागे घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा या 10 पैकी 9 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याने पोलीस दलात तर्क वितर्कांना उधाण आले आहे. या बदल्यांबाबतचे आदेश राज्य शासनाच्या गृहविभागाने काढले आहेत. बदली पोलिसांनी नेमणुकीच्या ठिकाणी हजर राहून तात्काळ कार्यभार स्वीकारावा, असे आदेशात म्हटले आहे.
सविस्तर वाचा :'त्या' वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याच! कारण अस्पष्ट..
- मुंबई - देशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्राच्या मंत्रालयात कोरोनाचा पुन्हा संसर्ग वाढला आहे. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील एक शिपाई आणि टंकलेखक लिपिकाला कोरोनाची लागण झाली आहे. टाळेबंदी 1 खुली झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने मंत्रालय सुरू करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे.
सविस्तर वाचा :मंत्रालयातील दोन कर्मचारी कोरोनाबाधित; सरकारची वाढली डोकेदुखी
- पुणे - उपमुख्यमंत्री यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याने सोमवार 13 जुलैपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
सविस्तर वाचा :LockDown : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा लॉकडाऊन; अजित पवारांची घोषणा
- ठाणे- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातून पळालेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा रुग्ण गेल्या दोन तासाहून अधिक वेळ फुटपाथवर तडफडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. अखेर दोन तासानंतर या रुग्णाला पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याने महापालिका आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे आणखी एक बळी गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
सविस्तर वाचा :धक्कादायक; कोविड रुग्णालयातून पळालेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा फुटपाथवर मृत्यू, नागरिकांमध्ये संताप
- जळगाव - खाऊचे आमिष दाखवून एका नराधमाने 10 वर्षाच्या मुलीवर पाशवी अत्याचार केला. ही संतापजनक घटना शुक्रवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास शहरातील गोलाणी मार्केटमध्ये तिसऱ्या मजल्यावर घडली. मुलीवर अत्याचार केल्यानंतर नराधम घटनास्थळावरून पळून गेला.
सविस्तर वाचा :जळगावात १० वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार ; खाऊचे आमिष दाखवून गैरकृत्य
- मुंबई- कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर प्रभावी असलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शनचा राज्यभरात तुटवडा आहे. अशा स्थितीत इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा विविध संघटनाकडून आरोप होत आहे. असे असले तरी अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त अरुण उन्हाळे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा दावा फेटाळला आहे. मात्र, मुंबई व राज्यात मागणीच्या तुलनेत रेमडेसीवीरचा पुरवठा कमी होत असल्याचे त्यांनी मान्य केले.