तिरुवनंतपूरम - कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेक स्थलांतरित कामगार, मजूर देशातील विविध राज्यांमध्ये अडकले आहेत. कर्नाटकातील ग्रामीण भागात मूळचे केरळमधील अनेक शेतमजूर अ़डकून पडले आहेत. ईटीव्ही भारतने कामगारांची दयनीय अवस्था समोर आणल्यानंतर केरळ सरकारने मजूरांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
केरळचे परिवहन मंत्री ए. के शशीधरण यांनी या प्रकरणी लक्ष घातले आहे. या मजूरांना कर्नाटकातील ग्रामीण नागरिकांकडून तसेच पोलिसांकडून त्रास दिला जात आहे. ईटीव्ही भारतने कामगारांची अवस्था समोर आणली. त्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली. केरळच्या नागरिकांमुळे कोरोनाचा प्रसार होता, असा अपप्रचार त्यांच्याविरुद्ध स्थानिक करत आहे. याची दखल केरळ सरकारने गांभीर्याने घेतली आहे.