महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लॉकडाऊनमुळे 600 किलोमीटर पायी निघाले होते कामगार, ईटीव्ही भारतने केली मदत - jharkhand lockdown

हे मजूर ज्याठिकाणी काम करत होते, त्या मालकाने त्यांना राहायला जागा आणि खाण्यासाठी अन्न न दिल्याने ते गावी परतण्यासाठी निघाले आहेत. कोणताच पर्याय शिल्लक राहिला नसल्याने घरी जायला निघाल्याची प्रतिक्रिया या कामगारांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

corona virus in jharkhand
लॉकडाऊऩमुळे 600 किलोमीटर पायी निघाले होते कामगार

By

Published : Mar 30, 2020, 2:02 PM IST

हजारीबाग- देशभरात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर स्थलांतरीत कामगारांचे पलायन सुरू आहे. अशातच छत्तीसगढ राज्यातील काही मजूर गिरीडीहकडे जाण्यासाठी पायी निघाले. यापैकी घरी जाऊ इच्छिणारे नऊ मजूर हजारीबाग बसस्थानकावर पोहोचले. हे सर्वजण 600 किलोमीटरचा प्रवास चालू लागले आहे. यासाठी त्यांनी काही वेळेसाठी एका ट्रकची मदत घेतली. त्यानंतर ते लोहदरगाहून चालत हजारीबाग येथे पोहोचले.

लॉकडाऊनमुळे 600 किलोमीटर पायी निघाले होते कामगार

हे मजूर ज्याठिकाणी काम करत होते, त्या मालकाने त्यांना राहायला जागा आणि खाण्यासाठी अन्न न दिल्याने ते गावी परतण्यासाठी निघाले आहेत. कोणताच पर्याय शिल्लक राहिला नसल्याने घरी जायला निघाल्याची प्रतिक्रिया या कामगारांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. हे मजूर गेल्या 2 दिवसांपासून उपाशी होते. स्थानिकांच्या मदतीने त्यांच्या जेवण्याची सोय करण्यात आली. तसेच ईटीव्ही भारतच्या मदतीने स्थानिक स्टेडीयममध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. या कामगारांनी घरी पोहोचवण्यासाठी ईटीव्ही भारतकडे मदतीची मागणी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंन्सिंग महत्वाचे असताना या स्थलांतरीत कामगारांवर उपासमारीची आणि उघड्यावर झोपण्याची वेळ आली आहे.

एका जागेहून दुसरीकडे स्थलांतरण करणाऱ्या नागरिकांना पलायन न करण्याची ईटीव्ही भारत विनंती करत आहे. सध्यातरी झारखंड राज्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही आहे. मात्र, इतर राज्यातून येणाऱ्या लोकांच्या माध्यमातून हा धोका उद्भवू शकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details