महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महाराष्ट्राची 'ही' IPS कन्या केरळमध्ये बजावतेय महत्वाची भूमिका... - आयपीएस तिरुअनंतपूरम बातमी

ईटीव्ही भारतला दिलेल्या एका खास मुलाखतीत शंगुमुघमच्या सहायक पोलिस आयुक्त ऐश्वर्या डोंगरे यांनी कोरोनव्हायरस आजारात लॉकडाऊन दरम्यान आलेल्या परिस्थितींबद्दल माहिती दिली.

etv-bharat-exclusive-interview-with-ips-aishwarya-dongre
etv-bharat-exclusive-interview-with-ips-aishwarya-dongre

By

Published : May 2, 2020, 11:51 AM IST

तिरुअनंतपूरम- भारतात हाहाकार माजवलेल्या कोविड -19 या साथीचा रोगासाठी देशभरातील नागरिक लढाई देत आहेत. मात्र, कोरोना विरुद्धच्या लढाईत डाॅक्टस, पोलीस, यांची भूमिका ही महत्वाची आहे. मुंबई येथून शिक्षण पूर्ण केलेल्या आयपीएस ऐश्वर्या डोंगरे या केरळमधील शांघुमुघममध्ये सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या शांधुमुघम येथे महत्वाची भूमिका बजावत आहेत. कोरोना व्हायरस साथीच्या आजारात लॉकडाऊन दरम्यान परिस्थिती कशा हाताळत आहेत याबाबत त्यांनी ईटीव्ही भारतशी विशेष बातचीत केली आहे.

महाराष्ट्राची 'ही' आयपीएस कन्या केरळात बजावतीये महत्वाची भूमिका...

हेही वाचा-कोरोनाविरुद्ध लढतायेत हे 'मराठी योद्धे', देशभर होतंय कौतुक

शांघुमुघममध्ये परप्रांतीय कामगारांना कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याठिकाणी ऐश्वर्या यांनी भेट दिली. 600 ते 800 कामगार शांघुमुघम अडकले आहेत. त्याच्यासोबत ऐश्वर्या यांनी एक तास चर्चा करुन त्यांना कोरोना बाबत जागृतीची माहिती दिली. त्यांच्या समस्या, समजून घेऊन त्यावर काय उपाय करता येईल याबाबत चर्चा केली. ऐश्वर्या सांगतात, कामगारांना भेटण्यासाठी गेल्यावर त्यांनी आमचे आभार मानले. त्यांनी आमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली तेव्हा आनंद झाला. हे माझ्यासाठी एक उपलब्धीच आहे.

ऐश्वर्या यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून (मुंबई) इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स विषयातील पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत पास केली. त्यांनतर तिरुअनंतपुरममध्ये त्यांना पहिली पोस्ट मिळाली. आता त्या मल्याळम शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details