इथिओपियन एअरलाइन्सचे विमान कोसळले, १५७ प्रवाशांचा मृत्यू - इथोओपियन एअरलाइन्स
इथिओपियन एअरलाइन्सच्या बोईंग ७३७-८०० एमएएक्स विमानाने तेथील स्थानिक वेळेनुसार सकाळी ८.३० वाजता अदिस अबाबाच्या विमानतळावरून उड्डाण घेतले होते.
नवी दिल्ली - इथिओपियन एअरलाइन्सचे १५७ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले आहे. इथिओपियाच्या अदिस अबाबा येथून केनियातील नैरोबी येथे जात असतांना हा विमान अपघात घडला. या विमानातून प्रवास करणारा एकही प्रवाशी बचावला नसल्याचे इथिओपियाच्या एका वृत्तसंस्थेने सांगितले आहे.
इथिओपियन एअरलाइन्सच्या बोईंग ७३७-८०० एमएएक्स विमानाने तेथील स्थानिक वेळेनुसार सकाळी ८.३० वाजता अदिस अबाबाच्या विमानतळावरून उड्डाण घेतले होते. मात्र, ८.४४ वाजताच्या सुमारास या विमानाचा संपर्क तुटला होता. विमान कंपनीने आपातकालीन क्रमांक जाहीर केले आहेत. प्रवाशांच्या नातेवाईकांना या क्रमांकावर संपर्क साधून अधिक माहिती मिळवता येईल, अशी माहिती विमान कंपनीकडून यावेळी देण्यात आली.