चैन्नई -देशभरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनामुळे देशामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तामिळनाडूमधील चैन्नई येथील एक रुग्ण राजीव गांधी रुग्णालयातून पळून गेल्याची घटना घडली. मात्र, पोलिसांनी त्याला पकडून पुन्हा रुग्णालयात आणले आहे.
रुग्णाने सोमवारी रात्री रुग्णालयातून धूम ठोकली आणि पायीच चालत घरी पोहचला. तो घरी पोहचण्यापूर्वी रुग्णालयातील कर्मचारी त्याच्या घरी पोहचले होते. उपचारासाठी कर्मचाऱ्यांनी त्याला पुन्हा रुग्णालयात परत आणले.