नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विभागाने मागील 15 कामकाजाच्या दिवसांमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त दावे निकाली काढले आहेत. यामध्ये कोरोना संबंधित 6 लाखांपेक्षा जास्त दावे निकाली काढण्यात आले आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत ईपीएफओ विभागाने जलदगतीने काम करत नागरिकांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून दिले आहेत.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे 10 लाखांपेक्षा जास्त दावे निकाली - COVID-19 corona claim
कोरोना संबंधित 1 हजार 954 कोटींचे दावे निकाली काढण्यात आले असून इतर प्रकरणे मिळून 3 हजार 601 कोटी रुपये कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीमधील पैसे काढण्याची परवानगी दिली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. तर पगारही कापण्यात येत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून भविष्य निर्वाह निधीमधून पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.
त्यानुसार कोरोना संबंधित 1 हजार 954 कोटींचे दावे निकाली काढण्यात आले असून इतर प्रकरणे मिळून 3 हजार 601 कोटी रुपये कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे एक तृतीयांश कामगारच कामावर येत आहेत. तरीही ईपीएफओ कार्यालयाने जलद गतीने काम करत दावे निकाली काढले आहेत.