महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचा भारतात पर्याप्त साठा - आरोग्य मंत्रालय

आतापर्यंत भारतात 1 लाख 21 हजार 271 जणांची कोरोना चाचणी घेतल्याचे आयसीएमआरचे तज्ज्ञ आर गंगाखेडकर यांनी सांगितले.

हायड्रोक्सी क्लोरोक्वीन
हायड्रोक्सी क्लोरोक्वीन

By

Published : Apr 8, 2020, 8:39 PM IST

नवी दिल्ली- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी हायड्रोक्सिक्लोरोक्वीन या गोळ्यांची मागणी केली आहे. भारताने या गोळ्या न दिल्यास जशाच तसे उत्तर देण्याची भाषा ट्रम्प यांनी केली आहे. त्यामुळे या औषधाची चर्चा सगळीकडे सुरू आहे.

या औषधांबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वाची माहिती दिली आहे. भारतातील रुग्णांच्या उपचारासाठी एचसीक्यू म्हणजेच हाड्रोक्लोरोक्लीन या औषधांची भारतात कमतरता पडणार नाही, असे अगरवाल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारतीयांना काळजी करण्याची गरज नसल्याचे संकेत आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.

आतापर्यंत भारतात 1 लाख 21 हजार 271 जणांची कोरोना चाचणी घेतल्याचे आयसीएमआरचे तज्ज्ञ आर गंगाखेडकर यांनी सांगितले. भारतामध्ये आत्तापर्यंत 5 हजार 194 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. काल दिवसभरात 773 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 402 रुग्ण उपचारानंतर पुर्णत: बरे झाले आहेत. एकून 149 जणांचा मृत्यू झाला असून 32 जणांचा काल दिवसभरात मृत्यू झाला, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details