महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

इंग्रजीच्या शिक्षेकेलाच वाचता येईना इंग्रजी; जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले निलंबनाचे आदेश

इंग्रजी शिक्षिकेलाच पुस्तकातील इंग्रजी मजकूर वाचता येत नसल्याचे उत्तरप्रदेशमध्ये शाळा तपासणीत समोर आले आहे.

English teacher
इंग्रजीच्या शिक्षेकेला वाचता येईना इंग्रजी

By

Published : Nov 30, 2019, 11:17 AM IST

लखनौ- देशात शिक्षण क्षेत्राची दुरवस्था झाली आहे, याचे उदाहरण उत्तरप्रदेश राज्यातील उन्नाव जिल्ह्यातून समोर आले आहे. इंग्रजी शिक्षिकेलाच पुस्तकातील इंग्रजी मजकूर वाचता येत नसल्याचे शाळा तपासणीत समोर आले आहे. सिकंदरपूर सरौसी येथे जिल्हाधिकारी शाळा तपासणीसाठी गेले असता ही धक्कादायक गोष्ट समोर आली.

जिल्हाधिकारी देवेंद्र कुमार पांडे सिंकदरपूर येथे सरकारी शाळा तपासणीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी राजकुमारी नावाच्या एका शिक्षेकेला इंग्रजीच्या पुस्तकातील उतारा वाचून दाखवण्यास सांगितले. मात्र, शिक्षिकेला पुस्तकातील मजकूर वाचता आला नाही, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा पारा चढला. त्यांनी शिक्षिकेला तत्काळ निलंबीत करण्याचे आदेश दिले. तसेच खडे बोल सुनावले.
शिक्षेकेलाच वाचता येत नसेल तर विद्यार्थ्यांना कसे शिकवणार, असा उद्विग्न सवाल त्यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांचा चढलेला पारा पाहून शिक्षिकेची बोलती बंद झाली. देशात सरकारी शाळांची आधीच दुरवस्था झाली असून अशा शिक्षिका जर मुलांचे भवितव्य घडवणार असतील, तर विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असेल, हे मात्र, नक्की.

ABOUT THE AUTHOR

...view details