भीलवाडा -हौसेला मोल नसते, हेच खरे! याचा प्रत्यय वारंवार येत असतो. लग्नसमारंभात तर प्रत्येकजण हटकून आपली हौस पुरवून घेत असतो. यात नवरदेव आणि नवरीचा पहिला नंबर लागतो. बँड-बाजा, घोड्यावरून वरात, डोली अशा हौशीखातर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. अशाच प्रकारची हौस राजस्थानातील भीलवाडा जिल्ह्यातील एका इंजिनिअर तरुणाने पुरवून घेतली आहे.
या तरुणाने आपली वरात चक्क हेलिकॉप्टरमधून वधूच्या घरी नेली. सुरेंद्र सिंह राठोड असे या इंजिनिअर तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील खुमान सिंह राठोड यांची मुलाच्या लग्नाची वरात हेलिकॉप्टरने नेण्याची इच्छा होती. या हौसेखातर त्यांनी ६ लाख ११ हजार रुपये हेलिकॉप्टरच्या एका दिवसाच्या भाड्यापोटी खर्च केले. वराचे कुटुंबीय भीलवाडा जिल्ह्यातील हुरडा पंचायत समितीच्या खेजडी पंचायतीतील मुरायला गावाचे रहिवासी आहेत.