महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

माजी उड्डयनमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना 'ईडी'कडून समन्स - माजी उड्डयनमंत्री

ईडीच्या चौकशीला सहकार्य करताना हवाई सौद्यातील किचकटपणा त्यांना समजावून सांगणार आहे. मी चौकशीसाठी तयार आहे, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

माजी उड्डयन मंत्री प्रफुल्ल पटेल

By

Published : Jun 1, 2019, 5:50 PM IST

नवी दिल्ली- उड्डयनमंत्री असताना झालेल्या घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी निदेशालयाकडून (ईडी) राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावले आहे. या प्रकरणी पटेल यांना ६ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

ईडीच्या समन्सवर बोलताना प्रफुल्ल पटेल प्रतिक्रिया देताना म्हणाले, ईडीच्या चौकशीला सहकार्य करताना हवाई सौद्यातील किचकटपणा त्यांना समजावून सांगणार आहे. मी चौकशीसाठी तयार आहे.

पटेल हवाईमंत्री असताना २००८-०९ या काळात अवैधरित्या विमान उड्डाणाचे सौदे करण्यात आले होते. दीपक तलवार याने फायद्याचे असणारे हवाईमार्ग काही कंपन्यांना मिळवून दिले आहेत, यासाठी दीपक तलवारला मोठी रक्कम मिळाला होती, असा आरोप ईडीकडून करण्यात आला होता. या आरोपावरुन दीपक तलवार याला काही महिन्यांपूर्वी अटक झाली होती. दीपक तलवार पटेल यांचा चांगला मित्र होता, असे ईडीचे म्हणने आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

काय आहे प्रकरण?


प्रफुल्ल पटेल हवाईमंत्री असताना ७० हजार कोटी रुपये किमतीच्या विमानांची खरेदी करण्यात आली होती. यादरम्यान, विमान कंपन्यांचे विलिनीकरण आणि खासगी कंपन्यांना महत्वाचे हवाईमार्ग मिळवून देण्याच्या व्यवहारात घोटाळे झाल्याचा आरोप होता. ईडीकडे या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details