चंदिगड- राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा यांनी ईडीद्वारे त्यांच्यावर सुरु असलेल्या तपासावर स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी त्यांच्यावर सुरू असलेला तपास हा राजकीय सूड उगविण्यासाठी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकीय सूड भावनेतून माझ्याविरुद्ध ईडीची कारवाई - भूपेंद्र सिंग हुड्डा
हुड्डा शनिवारी पत्रकारांच्या प्रश्णांना समोर गेले. ईडीद्वारे इंडस्ट्रीज प्लांटचा तपास सुरू आहे. या प्रकरणी गवाही देण्यासाठी आपण ईडीकडे गेलो असल्याचे त्यांनी सांगितले.
हुड्डा शनिवारी पत्रकारांच्या प्रश्णांना समोर गेले. ईडीद्वारे पंचकूला इंडस्ट्रीज प्लांटचा तपास सुरू आहे. या प्रकरणी साक्ष देण्यासाठी आपण ईडीकडे गेलो असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर माझी कुठलीही संपत्ती या प्रकरणात अडकलेली नाही. प्रसार माध्यमात माझ्याविषयी चुकीच्या बातम्या चालत आहे. माझी प्रकृती बिलकूल ठिक असून माझ्यावर सुरू असलेला तपास हा राजकीय सूड भावनेतून होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर, आपल्यावर होणारा तपास हा पारदर्शक आणि ईमानदारीने व्हायला हवा व त्यातून सगळी तथ्ये समोर यावी अशी मागणी त्यांनी केली.