जम्मू - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील तराल सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. तराल सेक्टरमधील गुलशनपुरा भागात पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर शोधमोहिम राबवली.
पुलवामातील तराल सेक्टरमध्ये सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये चकमक - दहशतवादी पुलवामा
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील तराल सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली
संग्रहित छायाचित्र
शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला. बराचवेळ गोळीबार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत सविस्तर माहिती अद्याप हाती आली नाही.
Last Updated : Jan 12, 2020, 12:31 PM IST