श्रीनगर - बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील वारापोरा येथे भारतीय जवानांसोबत दहशतवाद्यांची चकमक सुरू आहे. या परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय जवानांना मिळाल्यानंतर जवानांनी शोधमोहीम सुरू केली होती. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. दरम्यान या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
चकमक; भारतीय जवानांनी दहशतवाद्यांना घेरले, सोपोरमध्ये गोळीबार सुरू - गोळीबार
बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील वारापोरा येथे भारतीय जवानांसोबत दहशतवाद्यांची चकमक सुरू आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
वारापोरात दहशतवादी लपल्याची माहिती भारतीय जवानांना गुरुवारी रात्री मिळाली होती. त्यामुळे भारतीय जवानांनी या परिसरात काल रात्रीपासूनच शोधमोहीम सुरू केली. आज सकाळीशोधमोहिमेदरम्यानदहशतवाद्यांनी लष्करी जवानांवर गोळीबार केला. त्यामुळे जवानांनीही दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. या परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती सूत्रांनी दिली. या परिसरातील इंटरनेट सेवा सध्या बंद करण्यात आल्या आहेत. तसेच लष्करी जवान नागरिकांना या परिसरात न येण्याच्या सूचनाही करत आहेत.