श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्याविरोधात एन्काऊंटर ऑपरेशन सुरू केले आहे. यात अनंतनागच्या पोशक्रीरी परिसरात आज पहाटे (रविवार) सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू झाली आहे.
ईटीव्हीला मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान हे संयुक्तपणे दहशतवादी एन्काऊंटर मोहीम राबवत होते. आज पहाटे अनंतबागच्या पोशक्रीरी परिसरातील बिजबिहारा येथे त्यांची दहशतवाद्यांशी चकमक झाली. २ ते ३ दहशतवादी या परिसरात लपलेले आहे. या परिसरातील इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये भारतीय जवान आणि दहशतावांद्यामध्ये चकमक शनिवारी रात्री उशिरा जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना पकडले आहे. या कारवाईत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाच्या जवानांनी उत्तर काश्मीरच्या शेंगरगुंड येथून तीन दहशतवाद्यांना पकडले आहे. मुश्ताक अहमद मीर उर्फ लश्किरी, मुदस्सिर अहमद मीर आणि अतहर शमास असे पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे तिघेही काश्मीरमधील सोपेरच्या ब्राथ कलां परिसरातील निवासी आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सुरक्षा दलाच्या जवानांनी घाटीच्या कुलगाव जिल्ह्यातील खुर गावामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. एन्काऊंटर ऑपरेशन दरम्यान, जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक उडाली. तेव्हा या कारवाईत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा कंठस्नान घातले होते.
हेही वाचा -जम्मू-काश्मीर : कुलगाममध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा
हेही वाचा -छत्तीसगड सशस्त्र दलाच्या जवानाचा गोळीबार; 2 सहकाऱ्यांचा मृत्यू