महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ओडिशामध्ये सुरक्षारक्षक-नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू, १ जवान हुतात्मा - naxal attack

ओरिसा राज्यातील मलकनगिरी जिल्ह्यामध्ये आज (बुधवारी) सकाळपासून सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

संग्रहित छायाचित्र

By

Published : Aug 28, 2019, 11:43 AM IST

भुवनेश्वर- ओरिसा राज्यातील मलकनगिरी जिल्ह्यामध्ये आज (बुधवारी) सकाळपासून सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये एक जवान हुतात्मा झाला असून एक जखमी झाला आहे. सकाळी जिल्ह्यातील पेंदाघाटी परिसरामध्ये चकमक सुरू झाली आहे.

हेही वाचा - गोंदिया- छत्तीसगड सीमेवर चकमक.. सुरक्षा दलाकडून ७ नक्षलवाद्यांचा खात्मा

मलकनगिरी जिल्ह्यातील बोंडापर्वत भागामध्ये ही चकमक सुरू आहे. हा भाग घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. जखमी सैनिकाला रुग्णालयात दाखल केले असून अद्यापही चकमक सुरू आहे.

हेही वाचा - झारखंड: चाईबासा येथे नक्षलवादी हल्ल्यात ५ पोलिसांना वीरमरण

ABOUT THE AUTHOR

...view details