महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीर : नागोर्ता टोल प्लाझाजवळ चकमक; चार दहशतवाद्यांचा खात्मा - जम्मू काश्मीर चकमक

एका चारचाकीमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी बान टोलनाक्याजवळ उभ्या असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. याला प्रत्युत्तर देत सुरक्षा दलाच्या जवानांनी कारवाई करत चार दहशतवाद्यांना ठार केले...

Encounter breaks out near toll plaza in Jammu
जम्मू काश्मीर : टोल प्लाझाजवळ चकमक; चार दहशतवाद्यांचा खात्मा

By

Published : Nov 19, 2020, 8:14 AM IST

Updated : Nov 19, 2020, 10:23 AM IST

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये एका टोल प्लाझाजवळ गुरुवारी पहाटे सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. नागोर्ता भागामध्ये झालेल्या या चकमकीत चार दहतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

जम्मू काश्मीर : टोल प्लाझाजवळ चकमक; चार दहशतवाद्यांचा खात्मा

सर्च ऑपरेशन संपले; अधिकाऱ्यांची माहिती..

गुरुवारी पहाटे झालेल्या चकमकीनंतर परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. ही शोधमोहीम संपली असल्याचे अधिकाऱ्यांनी सकाळी सव्वादहाच्या सुमारास जाहीर केले. या संपूर्ण कारवाईत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, एक पोलीस अधिकारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनास्थळावर आढळलेली शस्त्रे..

पहाटे सुरू झाली चकमक..

एका चारचाकीमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी बान टोलनाक्याजवळ उभ्या असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. याला प्रत्युत्तर देत सुरक्षा दलाच्या जवानांनी कारवाई करत चार दहशतवाद्यांना ठार केले. या भागात अजूनही कारवाई सुरू असून, संपूर्ण परिसर लष्कराने सील केला आहे अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

जम्मू काश्मीर : टोल प्लाझाजवळ चकमक; चार दहशतवाद्यांचा खात्मा

नागोर्तामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली..

पहाटेपासून सुरू असलेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर टोल प्लाझा परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यासोबत, नागोर्ता ते उधमपूरपर्यंतची सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. या परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे.

या महिन्यातील कारवाया..

यापूर्वी आठ नोव्हेंबरला श्रीनगरच्या माचिल भागात एका दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी ठार केले होते. या कारवाईदरम्यान बीएसएफच्या एका जवानाला वीरमरण आले होते. तर, एक नोव्हेंबरला जम्मू काश्मिरात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहीदीन दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ठार झाला होता. या कारवाईत एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती.

हेही वाचा :जम्मू काश्मिरात हिज्बुल मुजाहीदीनचा म्होरक्या चकमकीत ठार

Last Updated : Nov 19, 2020, 10:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details