जम्मू काश्मीर - राज्यातील शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दले आणि दहशवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये लष्कराचे २ जवान जखमी झाले आहेत. पंडोशान खेडेगावामध्ये आज (शुक्रवार) सकाळी चकमक सुरू झाली.
जम्मू काश्मीरमध्ये शोपिया भागात चकमक सुरू, २ जवान जखमी - चकमक
जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी चकमक सुरु असलेल्या भागाला घेरले आहे.

चकमक
जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी चकमक सुरू असलेल्या भागाला घेरले आहे. या आधी ३१ जुलैला कांझलवान भागामध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते.
या हल्ल्याबरोबरच दहशतवाद्यांनी '५५ राष्ट्रीय रायफल्स' दलाच्या पथकाला आयईडी स्फोटाने उडवून देण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यात कोणाही जखमी झाले नाही. मात्र, लष्कराच्या एका वाहनाचे नुकसान झाले.