श्रीनगर- शोपीयानमधील पिंजोरा गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक उडाली. यात 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. या बाबतची माहिती जम्मू कश्मीर पोलीसांनी दिली आहे.
जम्मू-काश्मीर; शोपीयानमध्ये सुरक्षा दलाने केला 4 दहशतवाद्यांचा खात्मा
पिंजोरा गावात संशयित दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली.
शोपीयानमधील पिंजोरा गावात संशयित दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. यावेळी सुरक्षा दलावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर जवानानीही या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. ही माहीम सुरक्षा दलाच्या जवानां बरोबरच जम्मू कश्मीर पोलीसांनी संयुक्त पणे राबवली. रविवारीही काश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. गेल्या काही दिवसात काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या आहेत.