महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बडगाम जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाची कारवाई

जम्मू काश्मीर मधील बडगाम जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास सुरक्षा दलातील जवानांनी ही कारवाई केली.

By

Published : Oct 28, 2020, 8:55 AM IST

सुरक्षा दलाची कारवाई
सुरक्षा दलाची कारवाई

श्रीनगर - बडगाम जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलातील जवानांनी ठार केले आहे. मंगळवारी रात्री झालेल्या चकमकीत दहशतवादी ठार झाल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली. सुरक्षा दलातील जवानांनी चाडूरातील मौचवा येथे सर्च ऑपरेशन चालवले आहे. दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटली नाही.

बडगाव जिल्ह्यातील चाडूरा परिसरात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सुरक्षा दलाने त्याला चोख प्रत्यूत्तर देत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घटना घडली. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवणे सुरू असून एक विदेशी दहशतवादी असल्याची माहिती समोर येत आहे.

सुरक्षा दलाची कारवाई

हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी ताब्यात...

जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये सोमवारी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा एक अतिरेकी सुरक्षा दलांना शरण आला. या अतिरेक्याचे नाव साकिब अकबर वझा असे आहे. तो पुलवामाच्या गुलशानपूरा भागातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

एका दहशतवाद्याचा खात्मा...

सोमवारीच पुलवामाच्या नूरपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

बडगाम, शोपियानमध्ये कारवाया...

या महिन्यात भारतीय लष्कराने काश्मिरात विविध ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले आहेत. सात ऑक्टोबरला शोपियानमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर सोळा ऑक्टोबरला बडगामध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details