श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासून सुरक्षा दलांची दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. या चकमकीत आत्तापर्यंत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. तर एक लष्करी अधिकारी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जिल्ह्यातील पट्टन भागात अद्यापही सर्च ऑपरेशन सुरू आहे. भारतीय लष्कराने याबाबत अधिकृत माहिती दिली.
शुक्रवारी सकाळपासून बारामुल्ला जिल्ह्यातील येदीपोरा आणि पट्टण भागांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकांवर गोळीबार केला, आणि चकमकीस सुरूवात झाली. यामध्ये आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एक लष्करी अधिकारी जखमी झाल्याचे समजले आहे. या अधिकाऱ्याला ९२ बेस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, ही चकमक अद्यापही सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.