रायपूर- छत्तीसगड जिल्ह्यातील नारायणपूर येथे नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली आहे. जिल्ह्यातील कदनार भागामध्ये ही चकमक सुरू आहे. कदनार हा नक्षलग्रस्त परिसर आहे. या चकमकीत काही जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत चकमक, जवान जखमी झाल्याची माहिती - नक्षल हल्ला छत्तीसगड
जवानांचे पथक करियामेटा आणि कडेनार दरम्यान सुरू असलेल्या रस्ते बांधकामाला सुरक्षा पुरविण्यासाठी जात होते. त्यावेळी दडून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यात सुरुवात केली.
संग्रहित छायाचित्र
जवानांचे पथक करियामेटा आणि कडेनार दरम्यान सुरू असलेल्या रस्ते बांधकामाला सुरक्षा पुरविण्यासाठी जात होते. त्यावेळी दडून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यात सुरुवात केली. यावेळी जवानांनीही गोळीबार केला. या चकमकीत काही जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस महानिरिक्षक पी. सुंदरराज यांनी याबाबत माहिती दिली.