गुवाहाटी - आसाममध्ये यावर्षी आतापर्यंत चमकीमुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा १२० वर पोहचला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री पियुष हजारिका यांनी दिली आहे.
आसाममध्ये यावर्षी चमकींच्या बळींनी गाठला १२० चा आकडा - आरोग्यमंत्री - पियुष हजारिका
जपानी चमकीग्रस्त रुग्णांना सरकारी रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येत आहेत. तर, खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना १ लाख रुपयांची मदत देण्यात येत आहे.
हजारिका यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की जपानी चमकीग्रस्त रुग्णांना सरकारी रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येत आहेत. तर, खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना १ लाख रुपयांची मदत देण्यात येत आहे. दुर्गम भागात राहणाऱया रुग्णांवर डॉक्टर आणि पॅरामेडीकलचे पथक स्वत: जाऊन उपचार करत आहे. याशिवाय, डॉक्टरांचे पथक नागरिकांची प्रकृती तपासत असून चमकीसदृश्य रोग नसल्याची खातरजमा करत आहेत.
आरोग्यविभागाच्या आकडेवारीनुसार, आसाममध्ये २०१६ साली ९२, २०१७ साली ८७ तर, २०१८ साली ९४ जणांचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये चमकीने थैमान घातले होते. बिहारमध्ये चमकीमुळे जवळपास १४२ जणांचा मृत्यू झाला होता. अजूनही बिहारमध्ये चमकीच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.