खूंटी (झारखंड) - तोरपा क्षेत्रातील बाजारटांडजवळ एका विहिरीत हत्तीचे पिल्लू पडल्याची घटना घडली. दुसऱ्या दिवशीदेखील या पिल्लाने पाण्यातून बाहेर येण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. यावेळी आसपासच्या परिसरातील नागरिकांनी त्या पिल्लाला पाहण्यासाठी गर्दी केली होती. नागरिकांनी वन विभागाला याबाबत माहिती दिली आहे. सध्या वन विभागाच्या रेस्क्यू टीमकडून या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
झारखंडच्या खुंटी येथे हत्तीचे पिल्लू पडले विहिरीत! - jharkhand khunti news
झारखंडच्या खुंटी येथे एक हत्तीचे पिल्लू विहिरीत पडले आहे. तोरपा क्षेत्रातील बाजारटांडजवळ ही घटना घडली आहे.
हत्तीचे पिल्लू पडले विहिरीत
एक आठवड्यापुर्वी 16 डिसेंबरला तमाड सोनाहातू येथीलजिलिगसेरेंग येथे देखील एका हत्तीचे पिल्लू विहिरीत पडले होते. 16 तासानंतर वन विभागाने जेसीबीच्या मदतीने पिल्लाला बाहेर काढले होते.
गेल्या काही दिवसांपासून हत्तीचे झुंड तोरपा, कर्रा, बुंडू तमाड या परिसरात फिरत आहेत. त्यामुळे आसपासच्या गावांमध्ये हत्तींची दहशत पसरली आहे. हे हत्ती पीकांचे आणि फळांचे नुकसान करत आहेत.