नवी दिल्ली - मनुष्याला लाजवेल अशी कृती एका हत्तीने केल्याचा व्हिडिओ पाहून तुम्ही पण दंग व्हाल. बहूतेकवेळा माणसं हातातील कचरा हा कचराकुंडीमध्ये न टाकता बाहेर फेकतात. मात्र एका हत्तीने मोठ्या समजुतदारपणे बागेतली कचरा उचलून कचराकुंडीमध्ये टाकला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
जेव्हा हत्ती जमिनीवरील कचरा ऊचलून कचराकुंडीमध्ये टाकतो, पाहा व्हिडिओ - trash
एका हत्तीने मोठ्या समजुतदारपणे बागेतील कचरा उचलून कचराकुंडीमध्ये टाकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
![जेव्हा हत्ती जमिनीवरील कचरा ऊचलून कचराकुंडीमध्ये टाकतो, पाहा व्हिडिओ](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3838007-thumbnail-3x2-hat.jpg)
हत्ती
व्हिडिओमध्ये आपल्याला हत्ती जमिनीवरील कचरा उचलून कचराकुंडीमध्ये टाकताना दिसतो. तो आपली सोंड आणि पायाच्या मदतीने कचरा उचलून कचराकुंडीमध्ये टाकतो. ह्या व्हिडिओला लोकांनी पसंद केले असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जगभरातल्या पर्यावरणाच्या समस्या वाढत आहेत. यातील सर्वात मोठी समस्या आहे ती कचर्याची आहे. हातातील कचरा कचराकुंडीत न टाकता इतरत्र कुठेही फेकणारी लोक आपल्याला पाहायला मिळतात. मात्र अश्या लोकांपुढे या हत्तीने एक आदर्श ठेवला आहे.
Last Updated : Jul 14, 2019, 8:12 PM IST