चित्तूर- आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामध्ये विजेचा धक्का बसून हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी एका शेतामध्ये घडली. हत्तीचे पिल्लू आणि हत्तीण कुंपण ओलांडून शेतामध्ये जाण्याचा प्रयत्न करत असताना उघड्या वीज वाहक तारेच्या संपर्कात आल्याने पिल्लाचा मृत्यू झाला.
विजेचा शॉक बसून हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू - elephant news
पिल्लाचा मृत्यू झाल्यानंतर हत्तीण तब्बल १ तास पिल्लाला उठवण्याचा प्रयत्न करत होती.
विजेचा शॉक
पिल्लाचा मृत्यू झाल्यानंतर हत्तीण तब्बल १ तास पिल्लाला उठवण्याचा प्रयत्न करत होती. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून मृत हत्ती शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर मृत पिल्लाला पुरण्यात आले. विजेची तार तुटल्याचे वीज विभागाला कळवण्यात आले होते. मात्र, त्याकडे लक्ष देण्यात आले नाही, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.