महाराष्ट्र

maharashtra

केरळच्या कोलम जिल्ह्यात उभारले इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग स्थानक

By

Published : Sep 30, 2020, 10:09 PM IST

कोलम जिल्ह्यात २० हून अधिक ठिकाणी अशी चार्जिंग स्थानके उभारण्यात येणार असल्याचे अभियंता के. एस शैजू यांनी सांगितले. इलेक्ट्रीक वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात हवा, ध्वनी प्रदूषणाला आळा बसणार आहे. केरळमधील तिरुअनंतपुरम, एर्नाकुलम आणि थ्रीसूर जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच अशी स्थानके उभारण्यात आली आहेत.

कोलम
कोलम

कोलम (केरळ) - केरळ राज्य विद्युत मंडळाकडून जिल्ह्यात पहिले 'इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन' उभारण्यात आले आहे. २०१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्मितीला चालना देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर केरळ राज्यात इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढवण्यावर भर आहे.

केरळच्या कोलम जिल्ह्यात उभारले इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग स्थानक

केरळमध्ये इलेक्ट्रीक वाहनांच्या वापराला चालना मिळण्याच्या उद्देशाने या प्रकारची इलेक्ट्रीक चार्जिंग स्थानके उभारली जात आहेत. जिल्ह्यातील पहिले स्थानक केएसईबी ओलेईल विभागाच्या कार्यालयाजवळील विद्यालय जंक्शन येथे उभारण्यात आले असून ते सुरू करण्यासाठी केवळ औपचारिक सूचना मिळणे बाकी आहे. एकावेळी येथे दोन वाहने चार्जिंग करता येणार असून ८० किलोवॅट स्थानकाची क्षमता असणार आहे.

हेही वाचा -'बाबरी पाडणे हा पूर्वनियोजीत कट नव्हता', न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

हे स्थानक उभारण्यासाठी ३० लाख रुपये खर्च करण्यात आले असून ६० आणि २० किलोवॅट अशी दोन युनिट सुरू केली जाणार आहेत. २० किलोवॅटवर दुचाकी चार्जिंग केल्या जातील तर ६० किलोवॅटवर कार, चारचाकी चार्जिंग केल्या जातील. याचे दर अजून ठरवण्यात आलेले नाहीत. २०२२ पर्यंत राज्यात १० लाख इलेक्ट्रीक वाहने रस्त्यावर दिसतील, असे केरळच्या मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सांगितले आहे. कोलम जिल्ह्यात २० हून अधिक ठिकाणी अशी चार्जिंग स्थानके उभारण्यात येणार असल्याचे अभियंता के. एस शैजू यांनी सांगितले.

इलेक्ट्रीक वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात हवा, ध्वनी प्रदूषणाला आळा बसणार आहे. केरळमधील तिरुअनंतपुरम, एर्नाकुलम आणि थ्रीसूर जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच अशी स्थानके उभारण्यात आली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details