मनाली -लाहौल-स्पितीमधील रस्त्यांवर लवकरच विद्युत बस धावणार आहेत. हिमाचल राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कुल्लू बस डेपोने मनाली ते केलांग मार्गावर विद्युत बसेसचे यशस्वी परिक्षण केले. या बसेसेचा प्रदेशातील लोकांना फायदा होणार आहे.
मनाली ते केलांग मार्गावर धावणार विद्युतबस - हिमाचल राज्य मार्ग परिवहन महामंडळ न्यूज
हिमाचल राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कुल्लू बस डेपोने मनाली ते केलांग मार्गावर विद्युत बसेसचे यशस्वी परीक्षण केले. विद्युत बसमुळे प्रदूषण होत नाही. तसेच त्यांना दुरुस्त करण्यासाठीही जास्त खर्च येत नाही.
कुल्ली डिपोनेच राज्यात पहिल्यांदा विद्युत बस चालवल्या होत्या. यापूर्वी लाहौलमध्ये तीन विद्युत बस धावत होत्या. विद्युत बसमुळे प्रदूषण होत नाही. तसेच त्यांना दुरुस्त करण्यासाठीही जास्त खर्च येत नाही. बस खर्च कमी करून कर्मचाऱ्याच्या पगारात वाढ करण्याचा प्रयत्न एचआरटीसी करत आहे. यापूर्वी चालवण्यात आलेल्या विद्युत बसेसना विशेष स्वरुपात मनाली ते रोहतांग मार्गावर चालवण्यात आले होते. लाहौलसाठी बसेसेच परीक्षण यशस्वी झाले, असे एचआरटीसी केलांग डेपोच्या अधिकाऱ्याने सांगितले.