नवी दिल्ली - द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांना सुरक्षा अधिकाऱ्यानं तुम्ही भारतीय आहात का? असा प्रश्न विचारल्यानंतर आता एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. एका विमानतळावर कनिमोळी यांना सुरक्षाधिकाऱ्याने हिंदीमध्ये प्रश्न विचारल्यावर त्यांनी अधिकाऱयास तामिळ किंवा इंग्रजीमध्ये बोलण्यास सांगितले. मात्र,अधिकाऱ्याने त्यांना तुम्ही भारतीय नाही का?, असा उलट प्रश्न विचारला. यावर कनिमोळी यांनी आक्षेप घेत, हिंदी येणं हे भारतीयत्वाच्या समान आहे का?, असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, याप्रकरणावरून विरोधीपक्षांनी कनिमोळी यांच्यावर निशाणा साधला आहे.
हिंदीमध्ये प्रश्न विचारल्याने नव्या वादाला फुटलं तोंड ; कनिमोळी यांच्यावर भाजपची टीका
द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांना सुरक्षा अधिकाऱ्यानं तुम्ही भारतीय आहात का? असा प्रश्न विचारल्यानंतर आता एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. दरम्यान, याप्रकरणावरून विरोधीपक्षांनी कनिमोळी यांच्यावर निशाणा साधला आहे.
कनिमोळी यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष यांनी टिका केली आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुका काही महिने राहिल्या आहेत. मात्र, यांनी आताच प्रचार मोहिम सुरू केलीयं, अशी टीका कनिमोळी यांच्या ट्विटवर बी.एल. संतोष यांनी केली.
दरम्यान, कनिमोळी यांनी संपूर्ण घटनेची माहिती टि्वट करून दिली आहे. त्यांनी म्हटलं की, विमानतळावर एका सीआयएसएफ अधिकाऱ्याने मला हिंदीमध्ये प्रश्न विचारला. मात्र, मला हिंदी येत नसल्याने मी त्यांना तामिळ किंवा इंग्रजीतून बोलण्यास सांगितले. मात्र, त्या अधिकाऱ्यानं मला तुम्ही भारतीय आहात का?, असा प्रश्न केला. मला जाणून घ्यायचं की हिंदी येणं, हे भारतीयत्वाच्या समान आहे का?,” असा सवाल कनिमोळी यांनी टि्वटमध्ये केला आहे. दरम्यान, कनिमोळी यांच्या टि्वटनंतर सीआयएसएफनं या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.