भोपाळ - भोपाळ निवडणूक आयोगाने प्रज्ञासिंह ठाकूर यांना नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने प्रज्ञासिंह यांना ३ दिवसांची प्रचारबंदी केली होती, असे असतानादेखील प्रज्ञासिंह यांनी प्रचार केला. त्यामुळे आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे.
प्रज्ञासिंह ठाकूर यांना निवडणूक आयोगाची नोटीस - officer
निवडणूक आयोगाने प्रज्ञासिंह यांना ३ दिवसांची प्रचारबंदी केली होती, असे असतानादेखील प्रज्ञासिंह यांनी प्रचार केला. त्यामुळे आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे.
प्रज्ञासिंह ठाकूर
प्रज्ञासिंह ठाकूर या भोपाळमधून निवडणुकीसाठी उभ्या आहेत. बाबरी मशीद विध्वंस झाल्याबद्दल प्रज्ञासिंह यांनी आनंद झाल्याचे वादग्रस्त मत व्यक्त केले होते. यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर तीन दिवस प्रचार बंदी लागू केली होती. ही प्रचारबंदी गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासून सुरु झाली होती. रविवारी प्रचारबंदी संपत असताना आयोगाने पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे.