महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंहांना आयोगाचा दणका; 'या' वक्तव्यावर मागितले स्पष्टीकरण - Bihar

लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर बेगुसराय येथे २४ एप्रिलला भाजपची सभा होती. त्यावेळी या सभेमध्ये अमित शाह उपस्थित होते. त्यावेळी गिरिराज सिंहांनी जे वक्तव्य केले त्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती.

गिरिराज सिंह आणि अमित शाह

By

Published : Apr 29, 2019, 7:36 PM IST

पाटणा -बिहारच्या बेगुसराय लोसकभा मतदार संघातून निवडणूक लढवणारे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या विरोधात निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. एका प्रचार सभेत त्यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासमोर मंचकावरून वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे आयोगाने त्यांना उत्तर मागितले आहे. त्यामुळे ते यावर काय स्पष्टीकरण देणार यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर बेगुसराय येथे २४ एप्रिलला भाजपची सभा होती. त्यावेळी या सभेमध्ये अमित शाह उपस्थित होते. 'जे वंदे मातरम म्हणू शकत नाहीत, त्यांच्याकडून मातृभूमिची पुजाही होऊ शकणार नाही. तुम्हाला तर ३ हात जमिन हवी आहे. मात्र, गिरिराज सिंहाच्या आई-बाबांचा गंगेच्या किनाऱयावर मृत्यू झाला होता. तेथे त्यांना पुरण्यास जमिनही मिळाली नव्हती', असे वक्तव्य जनसभेला संबोधित करताना गिरिराज सिंहांनी केले होते. त्यावरुन अयोगाने त्यांना ही नोटीस पाठवली आहे.

गिरिराज सिंहांनी दिलेल्या भाषणानंतर त्यांच्या विरोधात आचार संहिता भंग केल्यावरून तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर जनप्रतिनिधीत्व कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना लवकारात लवकर आपले स्पष्टीकरण देण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. गिरिराज सिंह बेगुसराय मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यासाठी आज चौथ्या टप्प्यात मतदानही पार पडले.

ABOUT THE AUTHOR

...view details