महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

...म्हणून योगी आदित्यनाथ यांना निवडणूक आयोगाने बजावली नोटीस

अरविंद केजरीवाल शाहीन बागमधील आंदोलकांना बिर्याणी खायला देतात, असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते. याप्रकरणी निवडणूक आयोगाने आदित्यनाथ यांना नोटीस बजावली आहे.

योगी आदित्यनाथ
योगी आदित्यनाथ

By

Published : Feb 6, 2020, 7:28 PM IST

नवी दिल्ली - योगी आदित्यनाथ यांनी शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारवर निशाणा साधला होता. अरविंद केजरीवाल शाहीन बागमधील आंदोलकांना बिर्याणी खायला देतात, असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते. याप्रकरणी निवडणूक आयोगाने आदित्यनाथ यांना नोटीस बजावली आहे.

1 फेब्रुवारील दिल्लीमधील करावल नगर चौकात आयोजित करण्यात आलेल्या एका रॅलीला योगी संबोधित करत होते. तेव्हा त्यांनी शाहीन बागेत सुरू असलेल्या सीएएविरोधी आंदोलनावरून केजरीवाल यांच्यावर टीका केली. अरविंद केजरीवाल शाहीन बागमधील आंदोलकांनी बिर्याणी खायला देत आहेत. त्यामुळे पाकिस्तानचे मंत्री केजरीवालांचे समर्थन करत आहेत, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. यावर निवडणूक आयोगाने आदित्यनाथ यांना नोटीस बजावून 7 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उत्तर मागितले आहे.
दिल्ली विधानसभेसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार असून मतमोजणी या ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. निवडणुकीत १३७५० पोलिंग बूथवर जवळपास १.४६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. एकाच टप्पात ही निवडणूक होणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 2015 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाने जबरदस्त यश मिळवत ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळवला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details