महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अजब कारभार...! मतदान ओळखपत्रावर कुत्र्याचा फोटो!

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये निवडणूक आयोगाने भोंगळ कारभाराचा कळस गाठला आहे. एका मतदाराला कुत्र्याचे छायाचित्र असलेले मतदान ओळखपत्र दिले. जुन्या मतदान ओळखपत्रांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता.

Sunil Kumar
सुनील कुमार

By

Published : Mar 5, 2020, 1:22 PM IST

कोलकाता - सरकारच्या विविध विभागांमध्ये अजब-गजब कारभार होत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत असतात. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये निवडणूक आयोगाने भोंगळ कारभाराचा कळस गाठला आहे. एका मतदाराला कुत्र्याचे छायाचित्र असलेले मतदान ओळखपत्र दिले आहे.

सुनील कुमार असे या मतदाराचे नाव असून ते मुर्शिदाबादजवळच्या रामनगरचे रहिवासी आहेत. जुन्या मतदान ओळखपत्रांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. मात्र, जेव्हा सुधारित ओळखपत्र हातात आले, तेव्हा ओळखपत्रावर स्वत:च्या छायाचित्राजागी कुत्र्याचे छायाचित्र पाहून सुनील कुमार यांना आश्चर्याचा धक्का बसला.

हेही वाचा -वाचा दिल्ली हिंसाचारातील शाहरुखचा थाट..! चार गर्लफ्रेंड.. पार्टी, टिकटा‌ॅक अन् जिमचे फॅड...

अधिकाऱ्याने माझ्यासमोर सही करुन हे ओळखपत्र मला दिले मात्र, त्यावरील छायाचित्र पाहण्याची तसदी त्याने घेतली नाही. याबाबत गट विकास अधिकाऱ्याकडे जाऊन पुन्हा असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घेण्याची विनंती करणार असल्याचे कुमार यांनी सांगितले.

दरम्यान, ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून नजरचुकीने हा प्रकार घडला असेल. कुमार यांच्या ओळखपत्रावरील छायाचित्र तत्काळ बदलण्यात आले आहे. त्यांना लवकरच नवीन मतदान ओळखपत्र मिळेल, अशी माहिती गट विकास अधिकाऱ्यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details