नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखांची प्रतीक्षा संपली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहिर केल्या असून, एकूण ७ टप्प्यांत निवडणुक होणार आहे. याचबरोबर अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिसा आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचीही घोषणा केली आहे.
लोकसभेबरोबरच 'या' 4 राज्यांत पार पडणार विधानसभा निवडणूक - sikkim
अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिसा आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचीही घोषणा केली आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये ६० जागांसाठी, सिक्किममध्ये 32 जागांसाठी, ओडिशामध्ये १४७ जागांसाठी तर आंध्र प्रदेशमध्ये 175 विधानसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे.
ओडिशामध्ये ११ एप्रिल ते २९ एप्रिलदरम्यान १४७ जागांसाठी ४ टप्यात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. यामध्ये ११, १८, २३ आणि २९ या तारखांना मतदान होणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये १७५ जागांसाठी ११ एप्रिलला मतदान होत आहे. सिक्किमध्ये ३२ जागांसाठी ११ एप्रिललाच मतदान होत आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये ६० जागांसाठी मतदान होत आहे.