नवी दिल्ली - ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातील क्वारंटाईन सेंटरमध्ये बुधवारी पहाटे एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. राधेश्याम पानी असे मृताचे नाव आहे. राधेश्याम हे 65 वर्षाचे होते. कोरोना चाचणीसाठी त्यांचे स्वॅब नमुनेही आज प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार होते.
ओडिशामधील क्वारंटाईन सेंटरमध्ये 65 वर्षीय व्यक्तीचा आढळला मृतदेह
ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातील मध्ये बुधवारी पहाटे एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. राधेश्याम यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
राधेश्याम हे कोरकोरा गावातील रहिवासी असून मंगळवारी ते कोलकाता येथून परतले होते. खबरादारी म्हणून, त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. आज सकाळी ते मृत अवस्थेमध्ये आढळले. ही माहिती अप्पर जिल्हाधिकारी श्यामा भक्त मिश्रा यांनी दिली.
राधेश्याम यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप कळू शकले नाही, असे मिश्रा यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. राधेश्याम यांना मधुमेह असल्याचे कुटुंबियांनी सांगितले. त्यांचा कोरोनामुळेच मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.