जयपूर- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यातच राजस्थानच्या कोटा शहरात एकाच दिवसात 10 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये 5 वर्षांपासून ते 70 वर्षांपर्यंतच्या रुग्णांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. तर एकाच कोरोनाने मृत्यूही झाला आहे.
हेही वाचा-'बिग बीं'नी शेअर केली ९ वाजून ९ मिनीटांची 'फेक' सॅटेलाईट इमेज, नेटकऱ्यांचा संताप
पॉझिटिव्ह रुग्णांंमध्ये एक 5 वर्षांचे मुलगा, 11 वर्षाची मुलगी, एक 18 वर्षांचा मुलगा, दोन 26 आणि 30 वर्षाची मुले, 32 वर्षांची एक महिला, एक 50, आणि 70 वर्षाची पुरुष यांचा समावेश आहे. याशिवाय घंटाघर येथील एका 24 वर्षांचा तरुणही पाॅझिटिव्ह आाला आहे.
दरम्यान, स्टेशन परिसरातील व्यक्तीचा मृत्यूनंतर वैद्यकीय अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. चौकशी केली असता, समजले की, तो व्यक्ती डाॅक्टरांच्या सल्ल्या शिवाय औषधांच्या दुकानातून औषध घेत होता.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 13 वा दिवस आहे.