महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

झारखंडमधील भीषण अपघातात ११ ठार, २३ गंभीर - zarkhand

अपघातानंतर स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी पोहोचत मदतकार्य सुरू केले. जखमींना तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये काही जणांची प्रकृती गंभीर असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

हजारीबाग जिल्ह्यात भीषण अपघातात ८ ठार

By

Published : Jun 10, 2019, 9:17 AM IST

Updated : Jun 10, 2019, 10:53 AM IST

हजारीबाग- झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील चौपारण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज पहाटे बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात घडला. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून २३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

झारखंडची राजधानी रांची येथून गया शहराकडे जाणारी महाराणी ट्रॅव्हल्सची बस समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. अपघात एवढा गंभीर होता की यात ११ जण जागीच ठार झाले. त्यात एका लहान बाळाचाही समावेश आहे. तर बसमधील इतर २३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी पोहोचत मदतकार्य सुरू केले. जखमींना तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये काही जणांची प्रकृती गंभीर असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Last Updated : Jun 10, 2019, 10:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details