नवी दिल्ली - उत्तराखंडमधील राजाजी व्याघ्र प्रकल्पातून आठ कॅमेरे चोरीला गेल्याची घटना घडली आहे. ही माहिती वन अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरांचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राजाजी व्याघ्र प्रकल्पातील आठ कॅमेरे चोरीला - राजाजी व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा चोरी
उत्तराखंडमधील राजाजी व्याघ्र प्रकल्पातून आठ कॅमेरे चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
उत्तराखंड
मेच्या पहिल्या आठवड्यात प्रकल्पाच्या चार वेगवेगळ्या भागातून कॅमेरे चोरीला गेले, अशी माहिती आरटीआर वॉर्डन कोमल सिंग यांनी दिली. प्रकल्पातील बेरीवाडा, रामगड रेंजचा सुस्वा बीट, मोतीचूर रेंजचा गंगा मजहरा आणि हरिद्वार रेंज येथून चोरीला गेले आहेत.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू असल्याचे सिंग यांनी सांगितले. जवळच्या भागातील घरफोडी करणाऱया लोकांनी कॅमेरे चोरी केले असावे. कारण, कॅमेर्याच्या मदतीने त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले होते, असेही त्या म्हणाल्या.