महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बकरी ईद : भारताकडून देण्यात येणारी मिठाई पाकिस्तानने नाकारली - Attari-Wagah Border

ईदच्या निमित्ताने भारतीय लष्कराने पाकिस्तानला मिठाई देण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानने भारताकडून देण्यात येणारी मिठाई नाकारली आहे.

भारत-पाकिस्तान

By

Published : Aug 12, 2019, 4:07 PM IST

नवी दिल्ली - भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण असले तरी भारतीय सैन्याने आपली परंपरा सोडलेली नाही. ईदच्या निमित्ताने भारतीय लष्कराने पाकिस्तानला मिठाई देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाकिस्तानने भारताकडून देण्यात येणारी मिठाई नाकारली आहे.


दोन्ही देशांच्या महत्त्वाच्या दिवशी दोन्ही सीमा दलाच्या रक्षकांकडून मिठाईची देवाणघेवाण होत असते. पाकिस्तान बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अटारी-वाघा बॉर्डरवर मिठाईचे देवानघेवाण होणार नाही, असा संदेश दिला आहे. दरवर्षी पाकिस्तानकडून संदेश प्राप्त झाल्यानंतर भारताकडून मिठाई दिली जात होती. मात्र यंदा असे झाले नाही, असे बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.


जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भारत-पाकमध्ये धावणारी समझोता एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णयही पाकिस्तानने घेतला होता. त्यावर भारतानेही दिल्ली-अटारी दरम्यान धावणारी समझोता लिंक एक्सप्रेस रद्द करत पाकला जशाच तसे उत्तर दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details