नवी दल्ली - देशभरात आज ईद उत्साहात साजरी केली जात आहे. ईदच्या मुहुर्तावर संपूर्ण देशातील मुस्लीम बांधवांनी एकत्र येत नमाज पठण केले. तसेच गळाभेट घेत एकमेकाना शुभेच्छा दिल्या.
रमजान महिन्याचा शेवट ईद सणाने होते. मंगळवारी रमजान महिन्यातील २९ वा रोजा होता. रात्री इफ्तारी संपताच चंद्राचे दर्शन झाल्याने मुस्लीम बांधवांनी ईद साजरी करण्यास सुरूवात केली.
मुस्लीम बांधवांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा दिल्लीतील जामा मशीद, अजमेर येथील शाह जमाल मशीद तर मुंबई येथील हमिदीया मशिदीत मुस्लीम बांधवांनी ईद साजरी केली. लहान-मोठ्यासंह सर्व जण आज एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आहेत.
ईद येताच बाजारपेठांत जोरदार तयारी होते. सर्वांनी नविन वस्त्र परिधान करून शिरखुर्मा आणि ईतर मिठाई वाटत ईच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ईदला ईद-उल- फीत्र, असे संबोधण्यात आले. फीत्रचा आर्थ दान, असा होतो. या दिवशी मुस्लीम बांधव दानधर्म करत अल्लाहकडे प्रार्थना करतात.