रायपूर - कोरोनाच्या या संकटकाळात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांचेच घरातून बाहेर पडणे बंद झाले आहे. तर, अत्यावश्यक सुविधा वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. त्यात दारूची दुकानेही बंद असल्यामुळे तळीरामांचे हाल होत आहेत. मात्र, दुसरीकडे काही ठिकाणी या लॉकडाऊनमुळे काही जणांची दारू पिण्याची सवय सुटल्याने त्यांनी लॉकडाऊनलाच धन्यवाद म्हणून आभार व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये काहीजण दारू मिळत नसतानाही आता आधीपेक्षा बरं वाटायला लागलं आहे. 'थँक यू लॉकडाऊन' आम्हाला दारूविना जगायला शिकवल्याबद्दल, असे म्हणाताना दिसत आहेत.
याबाबत मेडीकल कॉलेजचे डॉ. सुमित श्रीवास्तव म्हणाले, दररोज दारू पिणाऱ्या व्यक्तीला अचानक दारू मिळणे बंदच झाले, तर त्यांची प्रकृती बिघडू शकते. मात्र, काही कारणने त्यांना दारू मिळत नसेल आणि आता मी दारू पिणार नाही, असे जर त्यांनी मनात ठरवले. तर, काही दिवस त्यांच्या तब्येतीत बिघाड होईल मात्र, नंतर यशस्वीरित्या त्यांची दारूतून सुटका होऊ शकते.