महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

प्रतिष्ठित अशा 'चाणक्य' पुरस्कारावर 'ईनाडू वृत्तपत्रा'ची मोहर! - ईनाडू वृत्तपत्राचे संपादक नागेश्वर राव

ईनाडू वृत्तपत्राचा चाणक्य पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. बंगळुरुमधील आयोजित कार्यक्रमामध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. वृत्तपत्राला 'प्रिंट मीडिया ऑफ इयर' ने गौरवण्यात आले आहे.

प्रतिष्ठित अशा 'चाणक्य' पुरस्कारावर 'ईनाडू वृत्तपत्रा'ची मोहर!
प्रतिष्ठित अशा 'चाणक्य' पुरस्कारावर 'ईनाडू वृत्तपत्रा'ची मोहर!

By

Published : Mar 7, 2020, 8:03 AM IST

Updated : Mar 7, 2020, 8:46 AM IST

बंगळुरु -ईनाडू वृत्तपत्राचा चाणक्य पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. बंगळुरुमधील आयोजीत कार्यक्रमामध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. वृत्तपत्राला 'प्रिंट मिडिया ऑफ इयर' ने गौरवण्यात आले आहे.

प्रतिष्ठित अशा 'चाणक्य' पुरस्कारावर 'ईनाडू वृत्तपत्रा'ची मोहर!

ईनाडू वृत्तपत्राचे संपादक नागेश्वर राव यांनी पुरस्कार स्विकारला. या कार्यक्रमाचे आयोजन पीएससीआय या संस्थेने केले होते. यापूर्वी ईटीव्ही भारतला दक्षिण आशियातील 'सर्वोत्तम डिजिटल न्यूज स्टार्टअप पुरस्कार' आणि 'आयबीसी इनोव्हेशन अवॉर्ड २०१९' हे पुरस्कार मिळाले आहेत. डिजिटल मिडियामध्ये नाविन्यपूर्ण स्टार्टअपची सुरवात केल्यामुळे ईटीव्ही भारतला गौरवण्यात आले आहे.

ईनाडू दैनिक हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील सर्वात जास्त खप असणारे तेलगू वृत्तपत्र आहे. भारतीय भाषेच्या दैनिकांमध्ये ते चौथ्या क्रमांकावर आहेत. ईनाडूची स्थापना १९७४ मध्ये रामोजी राव यांनी केली होती.

सर्वाधिक खप असलेले तेलुगु दैनिक - ईनाडू आणि सात तेलुगु चॅनल्स असलेले ईनाडू टेलिव्हिजन यांची मालकी असलेले 'रामोजी ग्रुप' हे भारतातील सर्वात विश्वासू असे मीडिया हाऊस आहे. जे आपल्या सत्यतेसाठी आणि निःपक्षपातीपणासाठी प्रसिद्ध आहे.

Last Updated : Mar 7, 2020, 8:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details