महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्ली दंगलप्रकरणी ताहिर हुसेनच्या निवासस्थानासह सहा ठिकाणी ईडीचे छापे

ताहिर हुसेन सध्या न्यायालयीन कोठडीत असून दिल्ली हिंसाचार आणि मनी लॉड्रिंग प्रकरणी त्याचा तपास सुरू आहे. दिल्ली हिंसाचारात पैसे पुरवल्याचा आरोप हुसेनवर ठेवण्यात आला आहे.

सक्तवसूली संचलनालय
सक्तवसूली संचलनालय

By

Published : Jun 23, 2020, 6:55 PM IST

नवी दिल्ली -दिल्लीतील जातीय दंगलप्रकरणी आम आदमी पक्षाचे निलंबित नगरसेवक ताहिर हुसेन यांच्याशी संबधीत सहा ठिकाणी सक्तवसुली संचलनालयाने आज (मंगळवारी) छापे टाकले. हुसेन याच्यावर मनी लॉड्रिंग प्रकरणी गुन्हाही दाखल आहे.

ईडीकडून ईशान्य दिल्लीतील चार ठिकाणे आणि नोएडातील दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. हुसेन याच्या खजुरी खास येथील घराचाही यात समावेश आहे. हुसेन याची पत्नी चालवत असलेल्या कंपन्यांमध्ये ईडीच्या पथकाकडून तपास करण्यात येत आहे.

ताहिर हुसेन सध्या न्यायालयीन कोठडीत असून दिल्ली हिंसाचार आणि मनी लॉड्रिंग प्रकरणी त्याचा तपास सुरू आहे. दिल्ली हिंसाचारात पैसे पुरवल्याचा आरोप हुसेनवर ठेवण्यात आला आहे. त्याच्या मालकीच्या कंपनीच्या छतावर दंगलीत वापरण्यात आलेले साहित्य आणि शस्त्रास्त्रे सापडली होती. आयबी अधिकारी अंकित शर्माच्या हत्येचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

दिल्ली हिंसाचारप्रकरणी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत. सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा, भारतीय दंडसंविधान आणि शस्त्रकायद्यांतर्गत ताहिर हुसेनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली हिंसाचारानंतर ताहिर हुसेन फरार झाला होता. नंतर शहरातली कडकडडुमा न्यायालयात त्याने आत्मसमर्पण केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details