मुंबई - अवैधरित्या कर्ज दिल्या प्रकरणावरून आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्ष चंदा कोचर आणि व्हिडिओकॉन समुहाचे वेणुगोपाल धूत यांच्या निवास स्थानांवर सक्तवसुली संचालनालय (ईडी) आज तपास करणार आहे. मागच्याच महिन्यात यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. कोचर यांनी तब्बल ३ हजार २५० कोटींचे कर्ज व्हिडिओकॉन समुहाला दिले, असा त्यांच्यावर आरोप आहे.
देशातील तिसरी मोठी बँक समजल्या जाणाऱ्या आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्षा चंदा कोचर यांच्यावर अवैध कर्ज दिल्याचा ठपका आहे. हे कर्ज त्यांनी, त्यांचे पती व उद्योजक दीपक कोचर यांच्या सांगण्यावरून व्हिडिओकॉन समुहाचे संचालक वेणुगोपाल धूत यांना दिले होते. यानंतर नियमबाह्य वर्तनासंबंधी बँकेने त्यांच्यावर अंतर्गत चौकशी केली होती. त्यामध्ये त्या दोषी आढळल्या होत्या.