महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण : राजीव सक्सेना यांना इडी, सीबीआयचे समन्स

राजीव सक्सेना यांना ईडी आणि सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

राजीव सक्सेना

By

Published : Jul 7, 2019, 9:59 AM IST

नवी दिल्ली - ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी सहआरोपी राजीव सक्सेना यांना ईडी आणि सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. पुढील आठवड्यात त्यांची चौकशी होणार आहे.


राजीव सक्सेना यांना विदेशात जाऊन उपचार घेण्यासाठी परवाणगी देणाऱ्या दिल्ली न्यायालयाच्या निर्णायाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने एम्सच्या संचालकाना राजीव सक्सेना यांच्या आरोग्यासंदर्भातील अहवाल तीन आठवड्यात न्यायालयात सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. यासंबधीत पुढील सुनावणी 17 जुलैला होणार आहे.


ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात राजीव सक्सेनांवर ९० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वीच सक्सेनांचे दुबईतून भारतात प्रत्यर्पण करण्यात आलेले होते. सक्सेनासोबत दीपक तलवारलाही भारतात आणण्यात आले होते. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील मुख्य आरोपी ख्रिस्तियन मिशेललाही यापूर्वीच भारतात आणण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details