भोपाळ- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा आणि मोजर बेयरचा माजी कार्यकारी संचालक रतुल पुरी याला सक्तवसुली संचलनालय (ईडी) ने अटक केली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून ३५४ कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी रतुल पुरीला अटक करण्यात आली आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाने रतुल पुरी, त्यांची कंपनी, वडील आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक पुरी, आई शमिल नीता पुरी, संजय जैन आणि विनीत शर्मा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या सर्वांवर फसवणूक, कथितरित्या गुन्हेगारीचा कट आणि भ्रष्टाचारासारखे आरोप होते. तर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) यासंदर्भात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ३ दिवसांनी सक्तवसूली संचलनालयाने ही कारवाई केली आहे.