बंगळुरू- कर्नाटकमधील काँग्रेस नेते डी. के शिवकुमार यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीतून अटक केली आहे. त्यांना मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. ते कर्नाटकचे माजी मंत्री होते.
कर्नाटकमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते डी. के शिवकुमार यांना ईडीकडून अटक - बंगळुरू
कर्नाटकमधील काँग्रेस नेते डी. के शिवकुमार यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीतून अटक केली आहे. त्यांना मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. ते कर्नाटकचे माजी मंत्री होते.
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने डी. के शिवकुमार यांना समन्स बजावला होता. गेल्या वर्षी ईडीने त्यांच्या विरूद्ध आर्थिक गैरव्यवहार केल्याबाबत प्रकरण दाखल केले होते. कर चोरी, हवाला याप्रकरणी शिवकुमार यांच्याविरूद्ध प्रकरणे दाखल करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यांना पुन्हा ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
ईडीने ३१ ऑगस्ट रोजी त्यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी दिल्ली येथे बोलविले होते. रात्री ६ ते ११ वाजेपर्यंत त्यांची ईडीतर्फे चौकशी करण्यात आली होती. या चौकशीला आपण सहकार्य करित आसल्याचे त्यांनी सांगितले होते. डी.के शिवकुमार यांना २०१८ मध्ये ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, शिवकुमार यांनी चौकशीला हजर न राहण्याची सूट मागितली होती. याबाबत ईडीने त्यांची मागणी फेटाळली होती. नंतर या प्रकरणी त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, तेथे सुद्धा न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती.