नवी दिल्ली - काँग्रेसच्या 'न्याय' (NYAY - न्यूनतम आय गॅरंटी योजना) मध्ये देण्यात आलेल्या आश्वासनांवरती प्रतिक्रिया देणे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांना अडचणीचे ठरले आहे. या प्रतिक्रियेमुळे निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवली आहे. राजीव कुमार यांनी काँग्रेसच्या या आश्वासनावर टीका केली होती. अशा प्रकारच्या आश्वासनाची अंमलबजावणी करणे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी नुकसानकारक ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. आयोगाने राजीव कुमार यांना नोटीस जारी करत उत्तर मागवले आहे.
काँग्रेसच्या 'न्याय'वरती टीका केल्याने नीती आयोगाच्या उपाध्यक्षांना निवडणूक आयोगाची नोटीस - congress
राहुल गांधींनी 'किमान उत्पन्न हमी योजने'चे निवडणूकपूर्व आश्वासन दिले होते. यावर नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी टीका आणि ट्विट केले होते. कुमार हे 'शासकीय अधिकारी' श्रेणीत असल्याने त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करणे हे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन मानले गेले आहे.

काय म्हणाले होते राजीव कुमार?
नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी 'किमान उत्पन्न हमी योजने'चे आश्वासन पूर्ण करू शकत नसल्याचे म्हटले होते. हे आश्वासन म्हणजे निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मारलेली 'थाप' किंवा 'जुमला' आहे, असे कुमार यांनी म्हटले होते. हे आश्वासन आर्थिक मानकांवर खरे उतरत नसल्याचे त्यांनी म्हटले होते.